महायुतीच्या घटक पक्षांनी मांडली वेगळी चुल

  • Share this:

mahayuti new18 जानेवारी : भाजप शिवसेनेच्या युतीच्या वाटाघाटी सुरू असताना आता महायुतीच्या घटकपक्षांनी वेगळी चुल मांडण्याचा निर्णय घेतलाय. भाजप वगळता स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम आणि रासप हे घटकपक्ष महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वतंत्रपणं लढण्याची घोषणा केलीये.

नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवल्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी  शिवसेना आणि भाजपमध्ये युतीसाठी जोर बैठका सुरू आहे. मात्र अजूनही कोणताही निर्णय झाला नाही.

घटक पक्षांमध्ये हालचालींना वेग आला असून वेगळी चुल मांडण्याचा निर्णय घेतलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतंत्र लढणार असल्याचं जाहीर केलं.

भाजप- सेनेनं आम्हाला एकत्र घेतलं तर ठीक नाही तर आम्ही वेगळे लढू असं सांगत  जिल्हा परिषद, पंचायतसमिती आणि महापालिकामध्ये निवडणूक लढवणार असल्याचं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं.

तसंच भाजप शिवसेनेशी युतीसाठी चर्चा करते पण घटकपक्षांशी चर्चा होत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केलीये.  घटक पक्षातील रासपा,शिवसंग्राम,स्वाभिमानी शेतकरी संघटना,आरपीआय एकत्र घेऊन निवडणूक लढवणार असंही शेट्टी यांनी सांगितलं.

दुसरीकडे विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामची राजकीय पक्षांची नोंदणी झालीये. शुक्रवारी शनिवारवाड्यासमोर पक्षाची घोषणा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2017 05:12 PM IST

ताज्या बातम्या