युतीच्या जागावाटपाच्या चर्चेची सुरुवात सकारात्मक - अनिल देसाई

युतीच्या जागावाटपाच्या चर्चेची सुरुवात सकारात्मक - अनिल देसाई

  • Share this:

Yuti charcha banner121

18 जानेवारी :  शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आज (बुधवारी) मुंबईत पार पडलेल्या बैठकीत अखेर युतीच्या जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. जागावाटपाच्या या चर्चेची सुरुवात सकारात्मक झाल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली.

आजच्या बैठकीत शिवसेनेकडून अनिल परब, अनिल देसाई, रविंद्र मिर्लेकर उपस्थिती होते. तर भाजपकडून आशिष शेलार, प्रकाश मेहता आणि विनोद तावडेंनी हजेरी लावली होती.

गेल्या तीन दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. यादरम्यानच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील फोनवरूनही चर्चा केली होती. मात्र, या चर्चेचा रोख हा भाजपने उपस्थित केलेल्या पारदर्शकतेच्या मुद्द्यावरच होता. मात्र, आजच्या बैठकीत अखेर जागावाटपाच्या चर्चेला सुरूवात झाली.

यावेळी भाजपने सेनेसमोर समसमान जागावाटपाचा फॉर्म्युला ठेवल्याचं समजते. तसंच दोन्ही पक्षांकडून आग्रही असलेल्या वॉर्डांची यादीही एकमेकांना देण्यात येणार आहे. आता या यादीबद्दल वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचं अनिल देसाई यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 18, 2017, 4:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading