Elec-widget

माझं आडनाव तर माहीत आहे ना ?, नितेश राणे भूमिकेवर ठाम

माझं आडनाव तर माहीत आहे ना ?, नितेश राणे भूमिकेवर ठाम

  • Share this:

nitesh_rane_sot18 जानेवारी : गडकरींचा विषय संपला आहे. मराठा समाजाची जी भूमिका होती ती मी माझ्या पद्धतीने बोलून दाखवली असं सांगत काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी गडकरींचा पुतळा तोडणाऱ्यांना बक्षीस प्रकरणावर खेद ना खंत व्यक्त केली. तसंच बक्षीस मागे घेणार का असं विचारलं असता तर माझं आडनाव तर माहीत आहे ना अशी अरेरावीही राणेंनी केली.

पुण्यात संभाजी उद्यानामध्ये राम गणेश गडकरींचा पुतळा फोडणाऱ्यांना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना  नितेश राणेंनी 5 लाखांचं बक्षीस दिलं. त्यांच्या या भूमिकेमुळे गडकरींचा पुतळा फोडण्यास प्रोत्साहन दिल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसनेही नितेश राणेंच्या भूमिकेबद्दल हात झटकले आहे. नितेश राणेंची प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीने जाणून घेतली.  जेव्हा रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार तुटली होती. तेव्हा 24 तासांमध्ये भाजपचे नेते का आले नाही. नेमकं गडकरींचा वाद सुरू झाला तेव्हाच ही लोकं का बोलताय. मग आम्ही जातीवादी आहोत की ही लोकं जातीवादी आहे याचे उत्तर द्या असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थिती केला.

तसंच राम गणेश गडकरींचा पुतळा फोडण्याचा विषय आता संपला आहे. घटना घडून गेली आहे. आता परत मी काही त्यांच्या हातातून ते काढून घेऊ शकत नाही. सगळ्या मराठा समाजाची जी भूमिका होती ती मी माझ्या पद्धतीने मांडली अशी ठाम भूमिकाही राणेंनी मांडली. पुतळा तोडणाऱ्यांना  तुम्ही बक्षीस दिलं ते मागे घेणार  का ? असा सवाल केला असता. आता विषय संपलाय,तुम्हाला माझं आडनाव तर माहीत आहे ना" असं म्हणत नितेश राणेंनी आपली बाजू अधोरेखित केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2017 04:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...