सैराटमधील आर्ची-परशा बनले राज्य निवडणूक आयोगाचे ब्रॅँड अॅम्बेसेडर

सैराटमधील आर्ची-परशा बनले राज्य निवडणूक आयोगाचे ब्रॅँड अॅम्बेसेडर

  • Share this:

sairat newsy18 जानेवारी :  सैराट' चित्रपटातून तरुणाईला याडं लावणारी आर्ची-परशा जोडी अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत. पण यावेळी ते चित्रपटासाठी नाही तर मतदानासाठी मतदारांना आवाहन करताना दिसणार आहे.

रिंकू आणि आकाशला येत्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाचे ब्रँड अॅम्बेसेडर झाले आहे. याचा अर्थ नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' सिनेमाची 'झिंग' अजूनही कायम आहे. आर्ची-परशाला ब्रॅण्ड अॅम्बेसिडर करण्यासाठी 'सैराट' चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मंजुरी दिल्याचं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी ही कधीच समाधानकारक राहिलेली नाही. म्हणूनच महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. नवीन मतदारांमध्ये तरुणांची संख्या वाढती आहे. आर्ची आणि परशाला अॅम्बेसिडर करून या तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. राज्यात 8.34 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 12.16 लाख नोंदणीकृत मतदार आहेत. गेल्या काही वर्षांत मतदार नोंदणीत वाढ झाली असली, तरी ही संख्या वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2017 12:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading