मुंबईत युती झाली तरच राज्यात युती, शिवसेनेची नवी भूमिका

  • Share this:

uddhav-and-devendra

18 जानेवारी : मुंबईत जर युती झाली, तरच राजात सर्वत्र युती होण्याची शक्याता आहे. आज शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची युती संदर्भात दुसरी बैठक होत आहे. ही बैठक रावसाहेब दानवे यांच्या बी ७ या बंगल्यावर, दुपारी 1 वाजता होणार आहे. आज होणार्या बैठकीत मुंबई महापालिकेसाठी, दोन्ही पक्ष एकमेकांना आपले प्रस्ताव देणार आहेत.

या प्रस्तावात मुंबईतील २२७ वाॅर्ड पैकी कोणते वाॅर्ड हवे आहेत, याची माहीती असणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष वाॅर्डांचे जागावाटप करण्यासाठी दोन्ही पक्षांचे नेत्यांमध्ये रस्सीखेच होणार आहे. या जागावाटपासाठी कोणता फाॅर्मुला ठरणार? तसंच या फाॅर्मुलावर दोन्ही पक्षांचे समाधान होणार का? हा कळीचा मुद्दा असणार आहे. आणि याच मुद्यावंर युतीचं भवितव्यही अवलंबून असणार आहे.

याआधी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. या चर्चेत युतीसाठी सकारात्मक चर्चा व्हावी आणि २१ जानेवारी पर्यंत युती घोषीत करण्याची डेडलाईन पाळावी. या गोष्टीवर एकमत झालं आहे. नाहीतर शिवसेना २३ जानेवारीला, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी, षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात, त्यांचा निर्णय जाहीर करण्याच्या तयारीत असल्याची माहीती सुत्रांकडून मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2017 11:33 AM IST

ताज्या बातम्या