...म्हणून होतात शुक्रवारी चित्रपट रिलीज

...म्हणून होतात शुक्रवारी चित्रपट रिलीज

  • Share this:

film

18 जानेवारी : भारतात चित्रपटवेड्यांची आणि चित्रपटनिर्मात्यांचीही कमी नाही. जवळपास दर शुक्रवारी ३ ते ५ भारतीय सिनेमे चित्रपटगृहात रिलीज होत असतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की हे सिनेमे शुक्रवारीच का रिलीज होतात?

खरं पाहता शुक्रवार हा चित्रपट रिलीज होण्यासाठी अचुक वेळ आहे. आठवडाभर काम करणारे आपण या विकेंडची मोठी वाट बघत असतो. त्यातही दर विकेंडला चित्रपट बघायला जाणं अनेकांच्या फिक्स लिस्टमध्ये असतं. आवडत्या कलाकारांच्या चित्रपटासाठी सुट्ट्या ठरवल्या जातात. रिलीज डेटनुसार सिनेमा बघणं प्लॅन होतं.

शुक्रवारी चित्रपट रिलीज होण्यामागे आहे हॉलीवूड. शुक्रवारी चित्रपट रिलीज करणं ही मुळची त्यांची पध्दत,जिचं आपण अनुकरण केलं. 'गॉन विद द विन्ड' हा त्यांचा चित्रपट १५ डिसेंबर १९३९ रोजी शुक्रवारी रिलीज करण्यात आला होता.

तरीही भारतात १९५०पर्यंत चित्रपट शुक्रवारी रिलीज करण्याची पध्दत आली नव्हती. कारण १९४७मध्ये आलेला 'नील कमल' सोमवारी रिलीज करण्यात आला होता. खरं पाहता 'मुघल-ए-आझम' हा शुक्रवारी रिलीज होणाऱ्या चित्रपटांतला पहिला चित्रपट म्हणता येईल.

याबाबत आणखी एक कारण म्हणजे भारतात हा वार लक्ष्मीचा मानला जातो. त्यामुळे जर यादिवशी चित्रपट रिलीज झाला तर तो निर्मात्यांना चांगली कमाई मिळवून देईल,असा इथला विश्वास होता. तसंही चित्रपटाच्या मुहूर्तापासून ते प्रीमिअरपर्यंत सगळीकडेच देवाचं नाव घेऊन कामाला सुरुवात केली जाते.

याला एक व्यावसायिक कारणही आहे. या दिवसांत मल्टीप्लेक्स आणि मॉलचे रेट जास्त असतात. यादिवशी चित्रपटगृह दिल्याने भाडे म्हणून त्यातून त्या मालकांना जास्त पैसा मिळतो.

अशी ही शुक्रवारची कहाणी. सिनेप्रेमींसाठी हा दिवस महत्त्वाचा असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 18, 2017, 9:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading