नायजेरियात चुकीच्या बॉम्बहल्ल्यात शंभराहून अधिक ठार

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 18, 2017 12:58 PM IST

नायजेरियात चुकीच्या बॉम्बहल्ल्यात शंभराहून अधिक ठार

nigeria-refugee-camp-bombing-660x400

18 जानेवारी : नायजेरिया हवाई दलाच्या लढाऊ विमानाने चुकीने निर्वासितांच्या छावणीवर केलेल्या बॉम्बहल्ल्यामुळे शंभराहून अधिक जणांचा बळी गेला. 'बोको हराम' या दहशतवादी संघटनेविरुद्ध हवाई दलाची कारवाई सुरू होती.

लष्करी कमांडर मेजर जनरल लकी इराबॉर यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ईशान्येकडील कॅमेरून सीमेजवळ हा 'अपघाती हल्ला' झाला. नायजेरियाच्या लष्कराने पहिल्यांदाच अशी चूक मान्य केली आहे, असं मानले जाते. इथल्या गावकऱ्यांनी याआधीही लष्कराच्या हल्ल्यांमुळे नागरिकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.

'बोको हराम'च्या अतिरेक्यांची जमवाजमव होत होती, असा संदेश मिळाल्यामुळे इराबॉर यांनी त्यांचा खात्मा करण्याची मोहीम आखली होती. इराबॉर हे अतिरेकीविरोधी कारवायांचे थिएटर कमांडर आहेत. लष्कराकडून हा हल्ला चुकून झाला असून या घटनेची चौकशी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2017 10:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...