तो तिमूर,आमचा तैमूर - सैफ अली खान

तो तिमूर,आमचा तैमूर - सैफ अली खान

  • Share this:

saif baby

18जानेवारी: बॉलिवूडच्या सैफीनाला मुलगा झाला आणि त्याचं नाव ठेवलं तैमूर. नंतर त्या नावावरून सोशल मीडियावर भरपूर चर्चा सुरू झाली.तैमूर हे हुकूमशहाचं नाव असल्यानं सैफ -करिनावर टीकाच जास्त झाली.

सैफनं सगळ्या प्रतिक्रियां थंडपणे ऐकून घेतल्या. कोणतंही स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला नाही. आता मात्र तो या सगळ्यावर बोललाय.

सैफ म्हणतो, 'मला तुर्की हुकूमशहाचा इतिहास माहीत आहे.तो तिमुर होता आणि माझ्या मुलाचं नाव त्याच्या नावावरून ठवलं नाहीये. माझ्या एका चुलत भावाचं नाव तैमुर होतं आणि मी लहानपणापासून त्याच्यासोबत राहतोय.माझी मुलगी सारा हिचं नावही माझ्या कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या नावावरून ठेवण्यात आलं होत.'

तो पुढे म्हणाला , 'मी आणि करिनाने निवडलेल्या हजारो नावांमधून दोघांनाही हे नाव आवडलं.तैमूरचा अर्थ लोखंड,लोह असा होतो.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2017 10:23 AM IST

ताज्या बातम्या