सहकार क्षेत्रात सफाईची मोहीम, 72 हजार संस्थांची नोंदणी रद्द

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 17, 2017 10:42 PM IST

Mantralaya17 जानेवारी : राज्यात सहकारी क्षेत्रात सरकारची साफसफाईची मोहीम सुरू आहे. गेल्या अनेक वर्षात ऑडीट न करणाऱ्या सहकारी संस्थावर कठोर कारवाई करण्यात आलीये. याच  मोहीमेअंतर्गत अंतर्गत राज्यातील 72 हजार सहकारी संस्थाची नोंदणी रद्द करण्यात आलीये.

राज्यात एकूण 2 लाख 38 हजार नोंदणीकृत सहकारी संस्था आहेत. यामध्ये अनेक संस्था बेकायेशीर काम करत होत्या. या संस्थानी कित्येक वर्ष ऑडीट केलं नाही, तसंच या संस्थांची सुरुवात, उद्देश याचा या संस्था चालकांना पत्ता नव्हता. आघाडी शासनाच्या काळात या संस्थावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. रद्द करण्यात आलेल्या संस्थामध्ये कामगार, पतपेढ्या, गृह निर्माण संस्थाचा समावेश आहे. यामध्ये सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील संस्थाचा समावेश आहे.

या दरम्यान राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदसुध्दा अनेक वर्षापासून रिक्त होते. तत्कालीन  सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या पदावर शेखर चरेगांवकर यांची नियुक्ती केली. चरेगावकर यांनी 2015-16 मध्ये सर्व सहकारी संस्थाचं सर्वेक्षण केल होतं. त्यामधून ही धक्कादायक माहिती समोर आली. याच आधारे या सर्व संस्थावर कारवाई करण्यात आली

सहकार क्षेत्रात सफाईची मोहीम

७२ हजार संस्थांची नोंदणी रद्द

Loading...

ऑडिट न करणाऱ्या संस्थांची नोंदणी रद्द

 ऑडिट न केलेल्या सहकारी मजूर संस्था

पतपेढ्या, गृहनिर्माणसंस्थांची नोंदणी रद्द

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2017 10:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...