उत्तर प्रदेशात अखिलेश आणि राहुलचा 'याराना'

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 17, 2017 10:15 PM IST

उत्तर प्रदेशात अखिलेश आणि राहुलचा 'याराना'

rahul_And_akhilesh17 जानेवारी : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या महाभारतात आता पुढचा अंक आहे तो अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्या मैत्रीपर्वाचा. अखिलेश यादव उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसशी युती करणार आहेत. या युतीची घोषणा लवकरच होऊ शकते.

अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि अजितसिंग यांचं राष्ट्रीय लोकदल यांच्यामध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. अखिलेश यादव ज्यांना तिकीट नाकारतील ते उमेदवार मुलायमसिंह यादव यांच्याकडे जाऊ शकतात. त्यामुळे अखिलेश यादव सावधपणे जागावाटपाचे निर्णय घेतायत.

समाजवादी पक्षात अखिलेश यादव यांचा गट नेहमीच काँग्रेसशी युती करण्याच्या बाजूने होता. उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही अखिलेश यांच्याशी युती करण्याचा सल्ला काँग्रेस नेत्यांना दिला होता. आता अखिलेश स्वतंत्रपणे लढणार असल्याने ही युती प्रत्यक्षात येणार आहे.

अखिलेश यादव आणि काँग्रेस यांची युती झाली तर उत्तर प्रदेशमधली मुस्लीम मतं समाजवादी पक्षाकडे जाणार नाहीत, असाही होरा या युतीमागे आहे. भाजपला प्रतिकार करायचा असेल तर काँग्रेसने प्रादेशिक पक्षांशी जास्तीत जास्त युती करावी, असा प्रशांत किशोर यांचा फॉर्म्युला होता. त्यांचा हा फॉर्म्युला बिहारमध्ये यशस्वी झाला.  आता उत्तर प्रदेशमध्ये ही युतीची युक्ती किती यशस्वी होते ते पाहावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2017 10:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...