आम्ही आरेला कारे करणारे,उगाच वाट्याला जाऊ नका -अजित पवार

आम्ही आरेला कारे करणारे,उगाच वाट्याला जाऊ नका -अजित पवार

  • Share this:

ajit_pawar_pimperi17 जानेवारी :  आम्ही आरे ला कारे करणारे आहोत,विरोधकांनी हे लक्षात घ्यावे उगीच आमच्या वाट्याला जाऊ नये असा इशाराचा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षातील बंडखोरांना आणि विरोधकांना दिलाय. तसंच भाजप गुंडांचा पक्ष आहे तशी प्रतिमाच त्यांनी निर्माण केली अशी टीकाही अजित पवारांनी केली.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पक्षात गडबड करणाऱ्यांना सज्जड दम दिला. कुणालाही आपण एकटं असल्याची भावना राष्ट्रवादी पक्ष आपल्या कार्यकर्त्याला वाटू देणार नाही. कुणी काही वेगळा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर  आम्ही आरे ला कारे करणारे आहोत. बघ्याची भूमिका घेणार नाही. एवढीच नोंद विरोधकांनी घ्यावी असा इशारा अजित पवारांनी दिला.

भाजप गुंडांचा पक्ष

देशात भाजपचं सरकार आल्यानंतर खासदारकीचे उमेदवार आयात केले होते. आयात करतांना आपण गुंड आयात केले हे भाजपच्या लक्षात आलं नाही. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहे. मोक्का अंतर्गत कारवाई झाली, खूनाचे गुन्हे दाखल आहे अशा लोकांना भाजपने प्रवेश दिला. त्यामुळे गुंडांचा पक्ष असल्याची प्रतिमा निर्माण झाली. त्यांच्या वरिष्ठांनी आम्ही समर्थन करत नाही असं सांगताना नाकीनऊ आले. एवढंच नाहीतर संघानेही नाराजी व्यक्त केली. कुणी कुणाला प्रवेश द्यावा ज्याचा त्यांचा प्रश्न आहे पण याचं भान बाळगावं असा सल्लावजा टोलाही अजित पवारांनी लगावला.

'त्या' प्रवृत्तींना वेळीच धडा शिकवा'

शाहू फुलेंच्या महाराष्ट्रात या गोष्टी अजिबात घडू नये. या पुतळ्याला अनेक वर्ष झाली. तरी देखिल कुणी काही बोललं नाही. एक चांगली व्यक्ती राम गणेश गडकरी आहे. त्यांच्याविरोधात खालच्या पातळीला जाऊन काम करणं हे विध्वंसक आहे. उद्या कुणीही उठेल आणि मी हे करेल आणि ते करेल अशी धमकी देईल. याबद्दल राज्य सरकारने कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काम करावं. जे कुणी अशा प्रवृत्तीला खतपाणी घालत आहे अशा लोकांना वेळीच धडा शिकवला पाहिजे असंही अजित पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2017 09:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading