भाजपमध्ये गुंडांचं शुद्धीकरण सुरूच, आणखी दोघांना प्रवेश

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 17, 2017 09:19 PM IST

भाजपमध्ये गुंडांचं शुद्धीकरण सुरूच, आणखी दोघांना प्रवेश

bjp_gunada_siload17 जानेवारी : पुण्यात गुंडाला प्रवेश दिल्यावर भाजपनं गुडांच्या एंट्रीवर फूल स्टॉप लावलेला दिसत नाही. औरंगाबादमध्ये सिल्लोड तालुक्यातील दोन गुडांना पक्षात वाजतगाजत प्रवेश दिला. यातील एकाच नाव ठगणराव भागवत पाटील आहे तर तर दुस-याचे नाव आहे विष्णू जांभूळकर.

भाजपनं गुंडांना पक्षात प्रवेश देण्याचा सिलसिला काही थांबला नाही. सिल्लोड तालुक्यातही भाजपनं दोन जणांना प्रवेश दिल्याचं उघड झालं आहे. दोघांवरही पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. ठगणराव पाटील याच्यावर फसवणूक, महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो सहा महिने जेलमध्ये होता. त्याला औरंगाबाद शहरात प्रवेशबंदीचा आदेशसुध्दा कोर्टाने काढलेला आहे. या आरोपांमुळे ठगण पाटलाची राष्ट्रवादीनं हकालपट्टी केली होती. त्यालाच भाजपने पवित्र करुन घेतलंय. दुसरा विष्णू जांभूळकर याच्यावर महिलांना अश्लिल संदेश मेसेज पाठवण्याचे गुन्हे दाखल आहे.

भाजपमध्ये गुडांच शुद्धीकरण

गंभीर गुन्हे असलेल्या ठगण भाजपमध्ये

420-आर्थिक फसवणूक करणे

Loading...

395-मारहाण करणे

307-महिलेला घरात घूसून मारहाण करणे

307-महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून मारण्याचा प्रयत्न

323- महिलेस मारहाण करुण जखमी करणे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2017 09:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...