मुंबईत भाजपची स्वबळावर लढण्याची चाचपणी

Sachin Salve | Updated On: Jan 17, 2017 10:51 PM IST

bjp_on_mumbai municipal corporation17 जानेवारी :   मुंबई महापालिकेसाठी भाजप - शिवसेनेची युती होणार का ? हा प्रश्न कायम आहे. त्यातच मुंबई महापालिकेच्या सगळ्या 227 वॉर्डांमधून लढण्यासाठी भाजपने चाचपणी सुरू केलीय. यासाठी भाजपच्या तीन दिवस बैठका चालणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.

भाजप आणि शिवसेनेची युती होणार का याबद्दल मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. पण यावर तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे एकीकडे चर्चा करायची तर दुसरीकडे स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू ठेवायची, असं दोन्ही पक्षांच्या गोटात सुरू आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांसाठीही भाजपने चाचपणी सुरू केलीय. प्रत्येक जिल्ह्यात भाजपने दोन निरीक्षक पाठवले होते. हे निरीक्षक बैठकीत अहवला सादर करणार आहेत. त्यावर निवडणूक समिती निर्णय घेईल. ही उमेदवारांची यादी मग मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 17, 2017 09:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close