सयाजी शिंदेंनी लावलेली झाडं अज्ञातांनी तोडली

सयाजी शिंदेंनी लावलेली झाडं अज्ञातांनी तोडली

  • Share this:

sayaji_shinde_tree17 जानेवारी : सातारा जिल्हयातील दुष्काळग्रस्त माण तालुक्यातील पांढरवाडीत हजारो झाडे लावणा-या अभिनेता सयाजी शिंदेच्या प्रयत्नांवर एका माथेफिरूने पाणी फिरवलंय.

काल मध्यरात्रीच्या सुमारास एका माथेफिरूने पांढरवाडी या गावातील 100 पेक्षा अधिक झाडांवर कु-हाड चालविली. सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावरील 4 गावांत सह्याद्री देवराई हा वृक्षारोपणाचा अभिनव प्रकल्प राबविताना अभिनेता सयाजी शिंदेनी स्थानिक गावक-यांच्या सहकार्याने हजारो वृक्षांची लागवड केलीय.

सयाजी आणि त्यांच्या सहकऱ्यांनी याठिकाणी श्रमदान करत ठिबकसिंचन सुरू केलं. मात्र माथेफिरुच्या कृत्यामुळं सयाजीही निराश झालाय. 100 झाडं तोडली नाहीतर 100 झाडांचा खून केलाय. झाडं लावणं ही काळाची गरज आहे. पण झाडं तोडणाऱ्या अशा माथेफिरुला अटक करा अशी मागणीही सयाजींनी केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 17, 2017, 7:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading