उमेदवाराची 'चिल्लर' आयडिया, जमा केली 10 हजारांची चिल्लर

Sachin Salve | Updated On: Jan 17, 2017 07:35 PM IST

उमेदवाराची 'चिल्लर' आयडिया, जमा केली 10 हजारांची चिल्लर

17 जानेवारी : जमाना फिल्मी आहे असं आपण नेहमीच म्हणतो. पण काही लोकं फिल्मी किश्श्यांचं अनुकरण करताना दिसतात. नागपूरच्या शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरताना विलास बल्लमवार या उमेदवाराने थोडी थोडकी नव्हे तर तब्बल दहा हजारांची चिल्लर जमा केली.

नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी कायम विनाअनुदानित शिक्षक संघाकडून  उमेदवारी अर्ज भरणाऱ्या विलास बल्लमवार यांनी अर्जासोबत भरायचे दहा हजार रुपये  सुट्टे पैशांमध्ये भरले. जवळपास साडे आठ हजार कायम विनाअनुदानित शिक्षकांकडून बल्लमवार यांनी एक एक रुपया जमा करून ही अनामत रक्कम भरली.ही चिल्लर मोजताना  निवडणूक अधिकाऱ्यांना घाम फुटला होता. गडचिरोली जिल्ह्यातील विलास बल्लमवार यांनी कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी ही निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 17, 2017 07:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close