निवडणुकीसाठी एमआयएमने कसली कंबर, मुस्लिम बहुल भागात 'पतंग' उडणार

Sachin Salve | Updated On: Jan 17, 2017 07:00 PM IST

Asad uddain owaisi3_0_0_0_017 जानेवारी : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एमआयएमने कंबर कसलीये. एमआयएम  मोठ्या ताकदीनं या निवडणुकीत उतरणार आहे. भायखळा, मानखुर्द, गोवंडी, वांद्रे आणि कुर्ला भागात एमआयएम उमेदवार उभे करणार आहे.

विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुकीत आपली दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या एमआयएम पक्ष आता दुसऱ्यांदा मुंबई पालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत एमआयएम पूर्ण ताकदीने उतरणार आहे.  एमआयएमचे भायखळ्याचे आमदार वारिस पठाण यांनी आज ही माहिती दिली.

निवडणुकीच्या प्रचारासाठी असादुद्दीन ओवेसी आणि अकबरुद्दीन औवेसी येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा समाजवादी पक्षांची मतं आम्ही फोडत नाहीत आम्ही स्वत:चे मतदार तयार केले आहेत. आता शिवसेना-भाजपच्या कारभाराला लोक कंटाळले आहेत. त्यामुळेच आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवणार आहोत असं त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 17, 2017 07:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close