युतीसाठी उद्धव आणि फडणवीसांमध्ये 'फोन पे चर्चा',उद्या पुन्हा बैठक

 युतीसाठी उद्धव आणि फडणवीसांमध्ये 'फोन पे चर्चा',उद्या पुन्हा बैठक

  • Share this:

uddhav_on_cm17 जानेवारी :  मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून चर्चा केली. आता उद्या रावसाहेब दानवे यांच्या सरकारी बंगल्यावर युतीची बैठक होणार आहे.

एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं या भोवती भाजप आणि सेनामध्ये युतीसाठी जोर बैठका सुरू आहे. सोमवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये पहिली बैठक पार पडली. पण या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा होईल आणि त्यानंतर पुढंचा निर्णय़ होईल असं ठरवण्यात आलं होतं. आज त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवर चर्चा झाली. युतीच्या चर्चेबाबत दोन्ही पक्ष अनुकूल असल्याचं त्यांनी सांगितलं. या चर्चेतून उद्या शिवसेना नेते आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. रावसाहेब दानवेंच्या सरकारी बंगल्यावर ही चर्चा होणार आहे. दरम्यान,  शिवसेना पारदर्शी कारभारावर अडून बसली आहे.  राज्य आणि केंद्रात पारदर्शी कारभार हवाय अशी अटच सेनेनं घातलीये.

तर दुसरीकडे भाजप नेते युतीचा निर्णय 21 जानेवारीच्या आत घेणार असल्याचं सांगतात. तर शिवसेनेचे नेते 21 जानेवारीनंतर युतीचा निर्णय होणार असल्याचं सांगतात. बाहेर कुणी काहीही बोललं तरी युतीच्या वाटाघाटींवर त्याचा परिणाम होणार नाही असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 17, 2017, 6:34 PM IST

ताज्या बातम्या