इंद्राणीला पीटर मुखर्जीकडून हवाय घटस्फोट

Samruddha Bhambure | Updated On: Jan 17, 2017 05:49 PM IST

 इंद्राणीला पीटर मुखर्जीकडून हवाय घटस्फोट

17 जानेवारी : शीना बोरा हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीसह सगळ्या आरोपींवर हत्येचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये  पीटर मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय या आरोपींचा समावेश आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच या खटल्याने आणखी एक नाट्यमय वळण घेतलंय.

इंद्राणी मुखर्जीला पीटर मुखर्जीकडून घटस्फोट हवा आहे. शीना बोरा हत्येच्या खटल्यामध्ये आरोप नक्की झाल्याच्याच दिवशी इंद्राणी मुखर्जीने पीटर मुखर्जीविरुद्ध घटस्फोटाचा खटला दाखल करण्याचं ठरवलंय. पीटर मुखर्जी हा इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा आहे आणि आता याही नातेसंबंधांमधून इंद्राणीला बाहेर पडायचंय.

24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची निर्घृण हत्या झाली होती. इंद्राणी मुखर्जी आणि संजीव खन्ना यांनी शीनाचा मृतदेह जाळून रायगड जिल्ह्यातल्या जंगलात पुरला होता. याप्रकरणी शीनाची आई इंद्राणी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय याला अटक केली होती. हे सर्व जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

शीना बोरा हत्या प्रकरणी पीटर मुखर्जीलाही सीबीआयने अटक केलीय. पीटरवर गुन्ह्याची माहिती लपवणे आणि कटात सहभागी होणे, असे आरोप ठेवण्यात आले आहेत.

इंद्राणीचे नातेसंबंध

- इंद्राणीचं पहिलं लग्न - सिद्धार्थ दास - मिखाईल आणि शीना (2मुलं)

- दुसरं लग्न - संजीव खन्ना - विधी (मुलगी)

- इंद्राणीचे तिसरे लग्न - पीटर मुखर्जी

- पीटर मुखर्जी यांना पहिल्या पत्नीपासून - रॉबिन राहुलसह 2 मुलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 17, 2017 05:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close