प्रियांकाचा नवा मराठी सिनेमा 'काय रे रास्कला...'

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 17, 2017 02:58 PM IST

प्रियांकाचा नवा मराठी सिनेमा 'काय रे रास्कला...'

priyanka-chopra_660_042313054728_020614072843

17 जानेवारी : 'व्हेंटिलेटर' सिनेमाच्या यशानंतर प्रियांका चोप्रा आणखी एक मराठी सिनेमा घेऊन येतेय. आता प्रेक्षकांना मनमुराद हसवण्यासाठी ‘काय रे रास्कला...’ म्हणत प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. तिच्या या नव्या सिनेमाचं नाव आहे 'काय रे रास्कला...'

नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. यावेळी निर्मात्या डॉ. मधु चोप्रा, चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीधरन स्वामी यांच्यासह चित्रपटातील कलाकारही उपस्थित होते. त्याशिवाय चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या कुनिका सदानंदही यावेळी उपस्थित होत्या. ‘काय रे रास्कला’ या चित्रपटासाठी कार्यकारी निर्मातीची भूमिका कुनिका सदानंद साकारत आहेत.

MUHURT

सिनेमात गौरव घाटणेकरसह अनेक मराठी कलाकार भूमिका साकारतायत.

Loading...

आपली प्रत्येक कलाकृती ही तितकीच सक्षम असावी आणि आपल्या शुभेच्छा त्या प्रत्येक गोष्टीला मिळाव्या यासाठी प्रियांका नेहमीच आग्रही असल्याचं आपल्याला दिसतं. नुकत्याच पार पडलेल्या या मुहूर्तावेळी प्रियंका चोप्रा स्वत: उपस्थित राहू शकली नसली तरी व्हिडियोद्वारे तिने ‘काय रे रास्कला’च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. तर हा चित्रपटही प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी होईल अशी आशा तिनं व्यक्त केली आहे.

या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली अाहे. सिनेमाच्या नावातच दाक्षिणात्य तडका असलेला ‘काय रे रास्कला...’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शनासाठी सज्ज होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2017 11:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...