शीना बोरा हत्या प्रकरण: इंद्राणी, पीटर मुखर्जींवर आरोप निश्चित

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 17, 2017 05:51 PM IST

sheena peter

17 जानेवारी :  संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेल्या बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीसह सर्व आरोपींवर हत्येचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. या प्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली. यात पीटर मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय याच्यावर हत्येचा आरोप निश्चित करण्‍यात आला आहे.

दरम्यान, एप्रिल 2012 मध्ये शीना बोराची निर्घृण हत्या झाली होती. पोलिसांनी गेल्या वर्षी शीनाची आई इंद्राणी आणि तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय याला अटक केली होती. हे सर्व जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. इंद्राणीचा दुसरा पती पीटर मुखर्जीला याला सीबीआयने अटक केली होती. पीटरवर गुन्ह्याची माहिती लपवणे आणि कटात सहभागी होणे, असे आरोप ठेवण्यात आले आहेत.

या मर्डर मिस्ट्रीचा घटनाक्रम

24 एप्रिल 2012 - काय घडलं त्यादिवशी ?

Loading...

- इंद्राणीने शीनाला सकाळी 6:30 वा. फोन केला

- बांद्र्यामधल्या नॅशनल कॉलेजजवळ शीनाला बोलावून घेतलं

- इंद्राणी तिचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय यांच्यासोबत कारमध्ये होती

- शीना राहुलसोबत बांद्र्याला पोहोचली आणि एकटीच इंद्राणीला भेटली

- इंद्राणीने शीनाला कारमध्ये बसायला सांगितलं

- कारमध्ये मागच्या सीटवर संजीव खन्नाला पाहिल्यावर शीनाने कारमध्ये बसायला नकार दिला पण इंद्राणीने तिला कारमध्ये खेचलं

- शीनाचा कारमध्येच खून झाला. संजीव खन्नाने शीनाचे हात पकडले, ड्रायव्हरने पाय पकडले आणि इंद्राणीने शीनाचा गळा दाबला

- शीनाचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्यात आला आणि तो खोपोली - पेण रस्त्यावर जंगलात टाकून देण्यात आला

शीनाच्या खुनानंतरचा दिवस

25 एप्रिल 2012

- राहुल मुखर्जीने शीनाच्या मोबाईलवर फोन केला पण फोन बंद होता

- राहुलने दोन दिवस वाट बघून खार पोलिसांकडे धाव घेतली

- खार पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे राहुल वरळी पोलिसांकडे गेला

- पोलिसांनी इंद्राणीला फोन केला तेव्हा इंद्राणीने त्यांना शीना अमेरिकेत असल्याचं सांगितलं

शीनाच्या खुनानंतरचे दिवस

26 एप्रिल 2012

- शीनाच्या फोनवरून राहुलला मेसेज आला.

- शीनाला त्याच्याशी असलेलं नातं संपवायचंय असा तो मेसेज होता.

- त्यानंतर राहुलने केलेले कॉल कुणीच उचलले नाहीत.

इंद्राणीचे नातेसंबंध

- इंद्राणीचं पहिलं लग्न - सिद्धार्थ दास - मिखाईल आणि शीना (2मुलं)

- दुसरं लग्न - संजीव खन्ना - विधी (मुलगी)

- इंद्राणीचे तिसरे लग्न - पीटर मुखर्जी

- पीटर मुखर्जी यांना पहिल्या पत्नीपासून - रॉबिन राहुलसह 2 मुलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2017 03:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...