राज ठाकरेंविरोधात सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 17, 2017 01:38 PM IST

Raj_at_MNS_Koli_Festival

17 जानेवारी :   छत्रपती संभाजी राजे यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरूध्द सिंदखेडराजा पोलिस स्टेशनमध्ये काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

अखिल भारतीय छावा संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष अमरदीप देशमुख यांनी सिंदखेडराजा पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही वृत्तवाहिन्या तसंच फेसबुक आणि व्हॉट्सअप सोशल मिडीयावर छत्रपती संभाजी महाराजाबद्दल राज ठाकरे यांनी अपमानजनक वक्तव्य करून संभाजी महाराजांची बदनामी केली आहे. त्यामुळे लाखो शिवभक्तांच्या भावना दुखवल्या आहेत.

याप्रकरणी राज ठाकरे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना त्वरीत अटक करावी, अशी मागणी छावा संघटनेने दिलेल्या तक्रारीत करण्यात आली. या तक्रारीवरून राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2017 01:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...