माओवाद्यांच्या अड्ड्यात पहिल्यांदाच सीआरपीएफची महिला अधिकारी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 17, 2017 12:41 PM IST

माओवाद्यांच्या अड्ड्यात पहिल्यांदाच सीआरपीएफची महिला अधिकारी

CRPF Maowadi

17 जानेवारी : छत्तीसगडच्या बस्तरमध्ये सीआरपीएफनं पहिल्यांदाच महिला ऑफिसरचं पोस्टिंग केलं आहे. उषा किरण असं या असिस्टंट कमांडंटचं नाव आहे. बस्तरमध्ये माओवादी विरोधी कारवाया करताना सीआरपीएफचे जवान गावकऱ्यांवर अत्याचार करतात, हा समज दूर करण्यासाठी उषा यांना तिथे पाठवलं असावं, असा अंदाज तज्ज्ञ लावतायेत.

आमच्यामध्ये आता महिला अधिकारी आल्यामुळे आमच्यावर लागणारे आरोप कमी होतील, असं उषा यांच्या एका सहकाऱ्याने सांगितलं आहे. सीआरपीएफला जेव्हा गावातल्या घरांमध्ये धाडी टाकाव्या लागतात, तेव्हा उषाचं तिथे असणं घरातल्या महिलांसाठी बरं पडतं. कारण त्यांना त्यामुळे जवानांची भीती वाटत नाही.

उषाचे वडीलही सीआरपीएफमध्ये अधिकारी आहेत. 27 वर्षांची उषा सीआरपीएफच्या 80 बटालिअनमध्ये आहे. तिची निवड झाल्यावर तिला 3 ठिकाणांचा चॉईस देण्यात आला होता. पण तिनं बस्तर निवडलं. आदिवासी लोक निर्दोष आहेत. माओवादामुळे तिथे विकास होऊ शकत नाहीय, असं उषाचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2017 12:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...