राष्ट्रवादीच्या बदामराव पंडित यांचा शिवसेनेत प्रवेश

Samruddha Bhambure | Updated On: Jan 17, 2017 02:37 PM IST

राष्ट्रवादीच्या बदामराव पंडित यांचा शिवसेनेत प्रवेश

17 जानेवारी :  राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री आणि नेते बदामराव पंडित हे आज शिवसेनेत प्रवेश केला आहेत. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. जिकडे सत्ता तिकडे पंडित हे पुन्हा एकदा अनुभवायला मिळतंय.

बदामराव पंडित हे गेवराईचे नेते असून बीड जिल्ह्यातल्या राजकारणातही त्यांचा दबदबा आहे. आतापर्यंत बदामराव पंडित हे कधी भाजपसोबत राहिलेत तर कधी राष्ट्रवादीत. पण पहिल्यांदाच ते शिवसेनेत प्रवेश करतायत. त्यामुळे गेवराईत तसंच बीड जिल्ह्यातल्या राजकारणात शिवसेनेलाही एक मोठा नेता मिळतोय. येणाऱ्या जिल्हा परिषद तसंच पंचायत समिती निवडणुकीत बदामराव पंडीतांमुळे शिवसेनेला फायदा होण्याची चिन्ह आहेत.

बदामराव पंडिततांचे कट्टर विरोधक असलेले अमरसिंह पंडीत हे सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे गेवराईतलं राजकारण या दोनच नेत्यांच्याभोवती फिरतं आणि एवढच नाही तर कोण कोणत्या पक्षात आहे, यावरून एकमेकांविरोधातले डावपेच आखले जातात.

त्यामुळेच बदामराव शिवसेनेते गेलेत तर अमरसिंह पुन्हा भाजपाकडं सरकतात की काय अशीही चर्चा आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य, साखर कारखान्यांचे चेअरमन, पंचायत समिती हे सगळं या दोन पंडितांच्या घरात किंवा त्यांच्या नातलगामध्येच आहे.

कोण आहेत बदामराव पंडीत?

  • गेवराईचे आमदार शिवाजीराव पंडित यांचा बदामरावांनी 95 साली पहिल्यांदा पराभव केला.
  • बदामराव पंडीत, शिवाजीराव पंडितांचे चुलतभाऊ आहेत.
  • बदामरावांना डावललं म्हणून शिवाजीरावांच्या विरोधात बंडखोरी करून लढले.
  • गोपीनाथ मुंडेंच्या पाठिंब्यावर बदामराव दोनदा अपक्ष आमदार राहिले.
  • अमरसिंह पंडित जे शिवाजीरावांचे पुत्र आहेत, त्यांनी पुन्हा बदामरावांचा पराभव केला.
  • अमरसिंह आणि बदामराव पंडित एकाच वेळेस भाजपातही राहिले.
  • सध्या अमरसिंह राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार आहेत तर बदामराव नेते.
  • पहिल्यांदाच आता बदामराव पंडीत हे राष्ट्रवादी किंवा भाजपाला सोडून शिवसेनेत प्रवेश करतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 17, 2017 02:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close