युतीचा फैसला आता उद्धव आणि फडणवीसांच्या हाती

  • Share this:

uddhav-on-fadnavis16 जानेवारी : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीबाबत शिवसेना आणि भाजपची पहिली बैठक कोणत्याही निर्णयाविना पार पडली. आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा होणार असल्याचं ठरलंय. तसंच युतीचा फैसला 21 जानेवारीपूर्वीच निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी स्वबळाचा नारा देणारे शिवसेना आणि भाजपचे नेते आता युतीसाठी आमनेसामने आले आहे. आज मुंबईत युतीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेकडून अनिल देसाई, अनिल परब तर भाजप कडून मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे चर्चेसाठी उपस्थित होते.

या बैठकीनंतर जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली. उद्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करतील आणि त्यांच्या आदेशानंतरच पुढची बैठक होईल अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली. तसंच युतीचा निर्णय घ्यायचा की नाही घ्यायचा याचा फैसला हा 21 जानेवारीपूर्वीच होईल असंही त्यांनी सांगितलं.

आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीसाठी थेट चर्चा होणार आहे त्यामुळे दोन्ही नेते काय निर्णय घेता याकडे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्याचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2017 10:24 PM IST

ताज्या बातम्या