'दंगल'गर्ल 'छोट्या गीता'ने का मागितली काश्मिरी लोकांची माफी ?

'दंगल'गर्ल 'छोट्या गीता'ने का मागितली काश्मिरी लोकांची माफी ?

  • Share this:

zaira wasim16 जानेवारी : दंगलमध्ये लहानपणीची गीता फोगट रंगवणाऱ्या झायरा वासिमने जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची भेट घेतल्याबद्दल आपल्या फेसबुक अकाउंटवर माफी मागितलीय. झायराने 14 जानेवारीला मेहबुबा मुफ्ती यांची भेट घेतली होती. मेहबुबा मुफ्ती यांनी तिच्या दंगलमधल्या अभिनयाचं कौतुकही केलं होतं.

या भेटीबद्दल झायरावर सोशल मीडियावरून बरीच टीका झाली. त्यानंतर झायराने काश्मिरी लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागितलीय. काश्मिरी लोकांच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असं झायराने म्हटलंय. काश्मीरमध्ये गेल्या सहा महिन्यांत जे काही घडलंय त्याची मला जाणीव आहे, असं झायराने म्हटलंय.

काश्मीरमध्ये गेल्या सहा महिन्यांत तणावपूर्ण परिस्थिती आहे आणि त्याला मेहबुबा मुफ्ती जबाबदार आहेत, असं काश्मिरी लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळेच झायरा आणि मेहबुबा मुफ्ती यांच्या भेटीला आक्षेप घेतला जातोय.

zaira wasim_muftiदंगलमधल्या 'छोट्या गीता'ची दिलगिरी

 ' मी काही लोकांची भेट घेतल्यामुळे किंवा माझ्या वागण्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या असतील किंवा त्यांना वाईट वाटलं असेल याची मला जाणीव आहे. पण कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.

मी फक्त 16 वर्षांची आहे आणि मला त्याप्रमाणेच वागवलं जावं. मी जे काही केलं त्याबद्दल मी दिलगीर आहे. तुम्ही मला माफ कराल, अशी मला आशा आहे. - झायरा वासिम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2017 09:41 PM IST

ताज्या बातम्या