गुन्हेगारांची कुंडली मतदान केंद्रांबाहेर झळकणार

  • Share this:

neta_salery16 जानेवारी : महानगर पालिकेच्या निवडणुकीत मतदार केंद्रांवर उमेदवरांवर दाखल गुन्ह्यांची  माहिती लावण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या उमेदवारांवर चाप लावण्यासाठी हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

उमेदवार अर्ज दाखल करताना जे प्रतिज्ञापत्र दाखल करतात. त्यामध्ये गुन्ह्यांची आणि उमेदवाराच्या सांपत्तीक स्थितीची माहिती असते. ही माहिती आता वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे. शिवाय उमेदवाराच्या वॉर्डातील मतदान केंद्राबाहेरही उमेदवारांची ही सगळी माहिती लावण्यात येणार आहे. या निर्णयानं आपला उमेदवार किती स्वच्छ आणि किती श्रीमंत आहे. याबाबत मतदारांना माहिती मिळणार आहे. या निर्णयामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांची मात्र चांगलीच अडचण होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2017 09:23 PM IST

ताज्या बातम्या