जागावाटप 2014 च्या फॉर्म्युल्यानुसार व्हावं, भाजपचा सेनेला प्रस्ताव

  • Share this:

sena_bjp316 जानेवारी : मुंबई महापालिका निवडणुकीत युती करावी का? या मुद्द्यावर शिवसेना भाजपमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे. जागावाटप हे 2012 च्या नाही तर 2014 च्या फॉर्म्युल्यानुसार व्हावं अशी मागणी भाजपने बैठकीआधी केलीये.

पारदर्शक कारभारावर युती होईल असा नारा लगावत भाजपने सेनेसोबत युतीचा निर्णय अधांतरी ठेवलाय. आज दोन्ही पक्षात बैठकीची पहिली  बैठक पार पडणार आहे. शिवसेनेकडून अनिल देसाई, अनिल परब तर भाजप कडून मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे चर्चेसाठी उपस्थित राहणार आहे. युतीबाबतच्या दोन्ही पक्षांच म्हणणं आणि दोघांचे प्रस्ताव नेमके काय असणार या मुद्यांची देवाणघेवाण होणार आहे. या बैठकीत विधानसभेसाठी 2014 च्या फॉर्म्युल्यानुसार जागावाटप व्हावं असा प्रस्ताव भाजप नेत्यांनी मांडलाय.

मुंबई पालिकेसाठी युती नेमकी कशी

करायची? याबाबत सेना भाजपची पहिली बैठक

उद्धव ठाकरेंनी सुरुवातीला युती करायची तर

लवकर करा अशी मागणी केली

उद्धव ठाकरेंच्या मागणीला प्रतिसाद देत

भाजपाची 'वर्षा'वर पहिली बैठक पार पडली

बैठकीनंतर भाजपानं शिवसेनेला युतीचा

प्रस्ताव पाठवला

प्रस्तावानंतर आज पहिली बैठक, भाजपाला

हव्यात शंभर पेक्षा जास्त जागा

शिवसेना भाजपाला फक्त 80 जागा

द्यायला तयार-सूत्रांची माहिती

विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी

वाढलीय, त्यामुळे जागा वाढवून हव्यात-भाजपा

आजच्या पहिल्या बैठकीत जागा

वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा अपेक्षीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2017 06:59 PM IST

ताज्या बातम्या