...तर 24 व्या आठवड्यात गर्भपात करण्यास कोर्टाची परवानगी

...तर 24 व्या आठवड्यात गर्भपात करण्यास कोर्टाची परवानगी

  • Share this:

suprim_court16 जानेवारी : गर्भातील व्यंगामुळे महिलेच्या जीवाला धोका असल्याने सुप्रीम कोर्टाने डोंबिवलीतील एका महिलेला २४ व्या आठवड्यात गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने रिपोर्ट सादर केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आज हा निर्णय दिलाय. या ऎतिहासिक निर्णयामुळे अनेक गर्भवती महिलांचे जीव वाचवण्यासाठी मदत होणार आहे.

डोंबिवली येथील एका गर्भवती महिलेच्या वतीने सुप्रीम कोर्टात सदर याचिका दाखल करण्झायात आली होती. या महिलेच्या गर्भातील बाळाची योग्य वाढ झाली नव्हती. बाळाच्या डोक्याच्या कवटीची योग्य वाढ झाली नसल्यामुळे महिलेच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र; गरोदरपणाला २० आठवड्यांचा कालावधी उलटल्याने महिलेला गर्भपात करता येत नव्हता. याप्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निकाल दिला. सात तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीच्या अहवालाच्या आधारे न्यायालयाने सदर महिलेला गर्भपाताची परवानगी दिली. न्यायाधीश एस.ए.बोबडो आणि न्या. एल एन राव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. महिला ही २२ वर्षीय असून तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहे.

'गर्भधारणा केव्हा करायची, गर्भ ठेवायचा की नाही हा सर्वस्वी स्त्रीचा मूलभूत अधिकार असल्याचं या अगोदर मुंबई उच्च न्यायालयाने महिला कैद्यांसंदर्भातील एका प्रकरणामध्ये म्हटलं होतं. मात्र, प्रत्यक्षात तो अधिकार सर्वच स्त्रियांना बजावता येत नाही. जुलै महिन्यात मुंबईत एका ४० वर्षीय महिलेच्या पोटात २४ आठवड्याच्या गर्भाचा मृत्यू झाला होता. मात्र गर्भपात करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. पुढे प्रकृती खराब होऊन महिलेचा मृत्यू झाला.देशात अनेक महिला अशा आहेत की त्या अशा वेळी न्यायालयात दाद मागू शकत नाहीत आणि मग गैरमार्गाने गर्भपात करतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आज च्या या निर्णयामुळे अश्या अनेक महिलांना दिलासा मिळणार आहे. सोबतच डोंबिवलीमधील या महिलेने दाखवलेले हे धैर्य समजा करीता अनुकरणीय आहे हे विशेष.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2017 06:18 PM IST

ताज्या बातम्या