S M L

सेनेच्या बालेकिल्ल्यात किरीट सोमय्यांची पत्नी लढणार ?

Sachin Salve | Updated On: Jan 16, 2017 04:26 PM IST

सेनेच्या बालेकिल्ल्यात किरीट सोमय्यांची पत्नी लढणार ?

16 जानेवारी : मुंबई महापालिकेसाठी शिवसेना - भाजपची युती होणार की नाही याची चर्चा अजूनही सुरूच आहे. पण त्याआधीच शिवाजी पार्कच्या जागेवरून शिवसेना -भाजपमध्ये चांगलीच जुंपलीय. या वॉर्डसाठी  शिवसेनेकडून माजी महापौर विशाखा राऊत यांचं नावं निश्चित करण्यात आलंय. पण भाजपने खासदार किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केलीय. मनसेकडून संदीप देशपांडेंची पत्नी स्वप्ना देशपांडे यांचं नाव चर्चेत आहे. यामुळे शिवाजी पार्कची लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.

नव्या प्रभागरचनेमध्ये शिवाजी पार्कचा वॉर्ड यावेळी महिलांसाठी राखीव झालाय. आतापर्यंत दादर हा शिवेसनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने इथे स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. त्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे राहुल शेवाळे खासदार म्हणून निवडून आले आणि सदा सरवणकर आमदार झाले. त्यामुळे या भागावर शिवसेनेचंच वर्चस्व आहे.

महापालिका निवडणुकीसाठी युतीची बोलणी अजून सुरू व्हायची आहेत पण त्याआधीच भाजप आणि शिवसेनेने एकमेकांच्या विरोधात दंड थोपटलेत. शिवाजी पार्क हा सेनेचा बालेकिल्ला असला तरी या जागेवर भाजप दावाच सांगणार नाही, असं सेनेने समजू नये हाच संदेश भाजपला द्यायचा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 16, 2017 04:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close