ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार, तीन नगरसेवक शिवसेनेत

ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार, तीन नगरसेवक शिवसेनेत

  • Share this:

ajasijdia

16 जानेवारी :  आगामी ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी राष्ट्रवादीला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

संजय भोईर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नगरसेवक देवराम भोईर आणि उषा भोईरही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या सगळ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे दिघा प्रकरणातील तीन दोषी नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर होते. नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते यांची शिवसेनेशी वाटाघाटी फिसकटल्याची माहिती आहे. गवतेंनी शिवसेनेकडे महापौरपदाची मागणी केल्यामुळे त्यांचा सेनाप्रवेश सध्या तरी बारगळला आहे. या तीनही नगरसेवकांनी खासदार राजन विचारे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2017 04:01 PM IST

ताज्या बातम्या