...तर माझ्या मुलांचा शिरच्छेद करीन - शाहरूख खान

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 16, 2017 01:11 PM IST

...तर माझ्या मुलांचा शिरच्छेद करीन - शाहरूख खान

srk-kids-75916 जानेवारी : महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर शाहरूख खाननं आपलं परखड मत व्यक्त केलंय. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणतो की, 'माझ्या मुलांना मी सांगितलंय,कोणत्याही महिलेला इजा पोहचवली,तिचा छळ केला तर तुमचा शिरच्छेद करीन.'

शाहरूख म्हणतो,'महिलांचा मान ठेवलाच पाहिजे आणि याला माझी मुलं अपवाद नाहीत.कोणतीही महिला तुमची मैत्रीण नसते.तिला मान दिलाच पाहिजे.तिच्याशी नीटच वागलं पाहिजे. बंगळुरू विनयभंग प्रकरणानंतर शाहरूखनं ही प्रतिक्रिया दिलीय.

शाहरूख खानला आर्यन आणि अबराम हे दोन मुलगे आहेत. शाहरुखच्या आयुष्यातही महिलांचं स्थान अतिशय महत्त्वाचं राहिलेलं आहे. लहानपणी त्याचे वडील गेल्यावर त्याच्या आईनं घरांमध्ये धुणी-भांडी करून त्याला वाढवलं. मुंबईत आल्यावर तो कुणीही नसताना गौरीनं त्याच्याशी लग्न केलं, आणि त्याच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. त्याची बहीण त्याच्याबरोबरच राहते.

त्याची मुलगी त्याची खूप लाडकी आहे. ती परदेशात जरी गेली तरी मी तिला सतत फोन करून तिची विचारपूस करत असतो, असं त्यानं अनेक मुलाखतींमध्ये सांगितलंय. त्यानं याआधी बेताल विधानं केलीही असतील.पण महिलांविषयी तो कधीही वावगं बोललेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2017 12:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...