S M L

काजोल पुन्हा माझ्या आयुष्यात येणार नाही - करण जोहर

Sonali Deshpande | Updated On: Jan 16, 2017 11:33 AM IST

काजोल पुन्हा माझ्या आयुष्यात येणार नाही - करण जोहर

16 जानेवारी: सध्या चर्चा सुरू आहेत त्या बाॅलिवूड स्टार्सच्या आत्मचरित्राच्या. त्यात भर पडलीय करण जोहरची. करण जोहरनं आपल्या आत्मचरित्रात खूप मनमोकळंं लिहिलंय.

'अॅन अनसुटेबल बाॅय' या त्याच्या आत्मचरित्रात त्यानं काजोल आणि आपल्या मैत्रीबद्दल सांगितलंय.तो म्हणतोय, 'आमची मैत्री तुटली.आता ती माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही.एक काळ होता की ती माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होती.'

karan_kajol_GE_01132017दोघांची मैत्री तुटल्याची आतापर्यंत चर्चा होती. पण करणनं या आत्मचरित्रातून त्यावर शिक्कामोर्तब केलं.त्यांची मैत्री तुटायला अजय देवगण कारणीभूत असल्याची चर्चाही बाॅलिवूडमध्ये आहे.अजय देवगणचा 'शिवाय' आणि करणचा 'ऐ दिल है मुश्किल' एकाच दिवशी रिलीज झाला होता. त्यावेळी अजयनं करणवर पैसे देऊन तो अजयची इमेज खराब करतोय, हा आरोप केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 16, 2017 09:38 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close