युतीसाठी सेना-भाजपची आज पहिली बैठक

युतीसाठी सेना-भाजपची आज पहिली बैठक

  • Share this:

SHIVSENA BJP FLAG

16 जानेवारी : मुंबई महापालिका निवडणुकीत युती करावी का? या संदर्भात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आज पहिली बैठक होणार आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता ही बैठक होणार असून बैठकीच ठिकाण मात्र अजूनही अनिश्चित आहे.

शिवसेना-भाजप युतीच्या बैठकीला चर्चेसाठी खा. अनिल देसाई, आ. अनिल परब आणि ज्येष्ठ शिवसैनिक रवींद्र मिर्लेकर यांची निवड उद्धव ठाकरेंकडून करण्यात आली आहे. तर भाजपाकडून आशिष शेलार आणि विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं आता बैठकीत काय निर्णय होतो याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आज होणार्या चर्चेत दोन्ही पक्षांकडून एकमेकांना मुंबईतील २२७ वाॅर्ड मधील कोणते वाॅर्ड लढवणार त्याची माहीती एकमेकांना दिली जाणार. कारण यावेळी नवीन वाॅर्ड रचना करण्यात आली आहे. त्यानंतर कोणत्या वाॅर्डची मागणी आहे, या संदर्भात चर्चा होईल. या चर्चेत दोन्ही पक्षांच्या विद्यमान नगरसेवकांच्या वाॅर्ड संदर्भात चर्चा होईल. दोन्ही पक्ष एकमेकांना किती वाॅर्ड देण्यासाठी तयार आहे, याचा प्रस्ताव देतील. पण आज वाटाघाटी होणार नाहीत. कारण दोन्ही पक्षातील प्रतिनिधी आपल्या वरीष्ठ पक्ष नेतृत्वाशी, आलेल्या प्रस्तवा संदर्भात चर्चा करणार आहे. त्यानंतर पुन्हा होणाऱ्या बैठकीत, नवीन वाॅर्ड रचने नुसार, वाटाघाटीला सुरवात होईल. यावेळी कोण किती जागा सोडतंय यावर युतीचं भवितव्य असणार आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी यावेळी ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांना युतीच्या चर्चेपासून दूर ठेवण्यात आल्याचं दिसतंय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मंत्र्यांची असमाधानकारक कामगिरी आणि शिवसैनिकांमधली वाढती नाराजगी पाहता उद्धव ठाकरेंनी ज्येष्ठ मंत्र्यांना डावलून ग्राउंड वर्कला काम करणाऱ्या संधी दिल्याचं म्हटलं जातंय.

या तिघांपैकी पश्चिम आणि पूर्व उपनगरातील वॉर्डांची जबाबदारी अनिल परब, दक्षिण आणि मध्य मुंबईची जबाबदार रवींद्र मिर्लेकर तर भाजपच्या प्रतिनिधींशी वाटाघाटी आणि समन्वयाची जबाबदारी अनिल देसाई यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2017 09:31 AM IST

ताज्या बातम्या