चिमुरडीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या नराधमांना अटक

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 15, 2017 09:33 PM IST

चिमुरडीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या नराधमांना अटक

3

15 जानेवारी : चार वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करुन हत्या करणाऱ्या तीन नराधमांना भाईंदर पोलिसांनी अटक केलीये. तर एका फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. भाईंदर पूर्वेच्या आझादनगरमधील गोल्डन नेस्ट सोसायटी भागात ही घटना घडलीये.

नऊ जानेवारीला पीडित मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून एका आरोपीनं झुडपात नेलं, तिथं अगोदरपासून आलेल्या तीन आरोपींनी मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केली. शिवाय तिचा मृतदेह नाल्यातल्या गाळात पुरुन टाकला.

पोलिसांनी या प्रकरणाचा कौशल्यानं तपास करीत वीस ते बावीस आरोपींना ताब्यात घेतलं. यातल्या तिघाजणांनी चिमुरडीवर बलात्कार केल्याची कबुली दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2017 07:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...