S M L

राज ठाकरे,अर्जुन कपूर 'बी हॅपी'ला उपस्थित

Sonali Deshpande | Updated On: Jan 15, 2017 04:42 PM IST

राज ठाकरे,अर्जुन कपूर 'बी हॅपी'ला उपस्थित

15 जानेवारी : मुंबईतील अंधेरी इथल्या लोखंडवाला बॅक रोड इथे बी हॅपी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेता अर्जुन कपूर उपस्थित होते.

महिलांच्या प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात साधारण दशकभरापूर्वी करण्यात आली होती पण आता याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.रविवारच्या दिवशी स्त्रिया आणि मुलांना मोकळेपणाने बाहेर पडून विविध खेळ, एरोबिक्स, चित्रकला या सगळ्यांचा आनंद लुटता यावा अशा पद्धतीनं या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. इंटरनेटमुळे मोबाईल, कंप्युटरमध्येच अडकून पडलेल्या मुलांनी घराबाहेर पडून खेळावं असा त्यामागचा उद्देश आहे.

अर्जुन कपूरनं आपण याच परिसरात लहानाचे मोठे झाले असून लोखंडवालात झालेला हा बदल आनंददायी असल्याचं सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2017 04:42 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close