संजय निरुपम यांचा अति आत्मविश्वास काँग्रेसला महागात पडणार - सचिन अहिर

संजय निरुपम यांचा अति आत्मविश्वास काँग्रेसला महागात पडणार - सचिन अहिर

  • Share this:

Sanjay sachin web

15 जानेवारी : संजय निरुपम यांचा अतिआत्मविश्वास काॅंग्रेसला बीएमसी निवडणुकीत महागात पडणार, अशी सणसणीत टीका राष्ट्रवादी काॅंग्रसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. मुंबई महापालिकेत आघाडी न करण्याची किंमत काॅंग्रेसला निवडणुकीत मोजावी लागेल असंही अहिर यांनी म्हटलंय.

निरुपम यांनी आपला आत्मविश्वास लोकसभा आणि विधानसभापर्यंत टिकवावा असा खोचक सल्लाही अहिर यांनी दिला आहे. योग्य वेळी आम्ही काॅंग्रेसला त्यांची जागा दाखवून देऊ असा इशाराही अहिर यांनी दिला आहे.

बीएमसीत आमच्या जागा निर्णायक ठरतील असंही अहिर यांनी म्हटलंय. काॅंग्रेसची आघाडी करण्याची भूमिकाही कायम सोयीस्कर असल्याचंही म्हणत अहिर यांनी काॅंग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. काॅंग्रेसशी आघाडी केल्याने आम्हाला मुंबईत आत्तापर्यंत वाढता आलं नाही अशी अहिर यांनी प्रांजळ कबुली दिली आहे.

तर भाजप आणि शिवसेनेनं युती करणं किंवा न करणं हा गोंधळ विरोधकांची स्पेस कमी करण्यासाठी आहे असा आरोपही अहिर यांनी केलाय. त्यामुळे काॅंग्रेसचं नुकसान होईल असं अहिर म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 15, 2017, 3:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading