S M L

मुंबई मॅरेथाॅनमध्ये भारतीय महिला विजयी

Sonali Deshpande | Updated On: Jan 15, 2017 01:50 PM IST

मुंबई मॅरेथाॅनमध्ये भारतीय महिला विजयी

15 जानेवारी : मुंबई मुख्य मॅरेथॉन पुरुष गटात टांझानियाच्या अल्फोन्स सिंबूने जिंकली तर ज्योती गावटे मुख्य मॅरेथॉन पार करणारी पहिली महिला धावपटू ठरली,महिला गटात मुख्य मॅरेथॉनमध्ये चाल्तु ताफा दुसऱ्या क्रमांकावर तर इथिओपियाच्या टिजिस्ट गिर्माने तिसरा क्रमांक पटकावला.

दुसरीकडे मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये महिलांमध्ये मोनिका अत्रे प्रथम, मिनाक्षी पाटील दुसरी तर अनुराधा सिंग तिसऱ्या क्रमांकावर तर मुंबई पुरुष हाफ मॅरेथॉनमध्ये जी लक्ष्मण प्रथम, सचिन पाटील दुसरा तर दीपक कुंभारने तिसरा क्रमांक पटकावला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस नेत्या प्रियंका दत्तसह अनेक बॉलिवडूकर मॅरेथॉनला उपस्थित होते.या मॅरेथॉनचे खास आकर्षण ठरले मालेगावचे 104 वर्षांचे आजोबा.त्यांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

दुसरीकडे सीएसटीकडून 42 किलोमीटरच्या 14 व्या मुख्य मॅरेथॉनला सुरुवात झाली. राज्यपाल विद्यासागर राव यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला.तर दिव्यांगांच्या मॅरेथॉन स्पर्धेत स्पर्धेंकांनी मोठा सहभाग नोंदवला.सीएसटीपासून सुरू झालेली ही मॅरेथॉन मेट्रो सिनेमाजवळ संपली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2017 01:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close