ठाण्यात आघाडीवर शिक्कामोर्तब, जागावाटपाचा निर्णय 21 जानेवारीला

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 14, 2017 09:41 PM IST

ठाण्यात आघाडीवर शिक्कामोर्तब, जागावाटपाचा निर्णय 21 जानेवारीला

NCP CONGRESS BANNER

14 जानेवारी : निवडणुकांची आचार संहीता लागल्यापासून चर्चा सुरू झाली आहे ती आघाडी आणि युतीची. आजवर युती आणि आघाडी होणार नाही असं ठामपणे सांगणारे पक्ष एकमेकांबद्दल नरमाईची भूमिका घेत, चर्चा करु असं बोलू लागले आहेत. त्यात किमान ठाण्यात तरी आघाडी होत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता तरी युती होणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

गेले कित्येक दिवस एकमेकांकडे ढुंकूनही न पाहणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आज ठाण्यात एकत्रित आले आणि आघाडीचा निर्णयही झाला. जागा वाटप 21  तारखेला ठरणार असलं तरी आघाडी होणार यावर शिक्कामोर्तब झाला. काँग्रेसचे नेते नारायण राणे, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. उपस्थित दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अनुकुलता दाखवली आणि मकर संक्रातीचा दिवस गोड करुन घेतला.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीनंतर आता युतीचं काय अशी चर्चा मात्र त्यामुळे सुरू झाली आहे. शिवसेनेचे ठाण्यातले जेष्ठ नेते एकनाथ शिंदे अजूनही कार्यकर्त्यांचा भर हा एकला चलो वर असल्याचं सांगत आहेत. तरी पक्ष प्रमुखांनी आदेश दिला तर आम्ही त्यांच्या आदेशाबाहेर नाही, हे ही सांगायला ते विसरले नाही.

एकुणच काय तर मकर संक्रातीचा दिवस, हा आघाडीनं तीळगूळ देवून-घेवून गोड केला आहे. पण सेना-भाजपचं उत्तरायण मात्र अजून सुरू होत नाहीए.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2017 09:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...