पेंच व्याघ्र प्रकल्पात गेल्या 24 तासांत दोन वाघिणीची मृत्यू

पेंच व्याघ्र प्रकल्पात गेल्या 24 तासांत दोन वाघिणीची मृत्यू

  • Share this:

9

14 जानेवारी : नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात गेल्या 24 तासांमध्ये दोन वाघिणींचा मृत्यू झालाय. खापा परिसरात या दोन्ही वाघिणींचा मृतदेह आढळला आहे. या वाघिणीचं वय अंदाजे 12 ते 13 वर्ष असल्याचं सांगण्यात येतं आहे.

तर कालच एक वाघीण आणि दोन सांबर मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. वाघिणीचा मृतदेह पोस्ट मार्टम साठी पाठवण्यात आला आहे. पोस्ट मार्टमच्या रिपोर्ट नंतर मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल.

याच आठवड्यात या जंगलात दोन बिबटे मृतावस्थेत सापडले होते. त्यांच्या डोक्यात गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. यामुळे या प्राण्यांची शिकार होतेय का, असा दाट संशय आहे.

इतक्या महत्त्वाच्या वनरीक्षेत्रात इतक्या सर्रासपणे शिकार करता येत असेल, तर वन खातं करतंय काय, हा मोठा प्रश्न आहे. एकीकडे सरकार फॉरेस्ट टूरि्झम प्रमोट करतंय, आणि दुसरीकडे वाघांची हत्या होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 14, 2017, 9:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading