पालिका निवडणुकीत रिपाईची भाजपशी युती - रामदास आठवले

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 14, 2017 08:36 PM IST

ramdas_Athavale_

14 जानेवारी :  मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होईल याबाबत माझ्या मनात शंका आहे. मात्र रिपाईची भाजपबरोबर युती राहील, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  दिली आहे.

मुंबईसह अन्य 10 महानगरपालिका निवडणुका नुकतीच जाहीर झाल्या आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेना-भाजपची युती होणार की नाही, यावर दोन्ही पक्षात सध्या संभ्रमाचं वातावरण आहे. कोणी एकत्र जाण्याच्या गोष्टी करतायेत तर कोणी एकला चलो रेचा नारा देतायेत. भाजप-सेनेची महायूती झाल्यास रिपाई 20 ते 25 जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा आठवलेंनी व्यक्त केली आहे.  पण शिवसेने सोबत नसेल, तर रिपाईला 45 जागा आणि मुंबई पालिकेत उपमहापौरपद, अशी मागणी आठवलेंनी केली आहे.

दरम्यान, गेल्या महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईत शिवसेना, भाजप आणि रिपाईची महायुती झाली होती. त्यावेळी रिपइंला 29 जागा देण्यात आल्या होत्या. पण त्यापैकी एकच जागा निवडून आली होती.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2017 08:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...