'#करूनदाखव'लं नंतर आता सेनेचं '#डिडयूनो?'

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 14, 2017 02:26 PM IST

'#करूनदाखव'लं नंतर आता सेनेचं '#डिडयूनो?'

Didyounow

14 जानेवारी :  महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजताच मुंबईत आता पोस्टरबाजीची सुरुवात झाली आहे. यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेच्या '#करुनदाखवलं' या टॅगलाईनऐवजी आता '#डीड यू नो' अशी नवी टॅगलाईन सेनेच्या पोस्टरवर झळकताना दिसत आहे.

तरुणांना आकर्षित करण्यासाठी 'डीड यू नो' अर्थात तुम्हाला माहिती आहे का, अशी नवी टॅगलाईन सेनेच्या पोस्टरवर झळकताना दिसत आहे. '#करुनदाखवलं' ही शिवसेनेची टॅगलाईन याआधी बऱ्याच चर्चेत सुद्धा राहिली होती. पण पालिकेच्या विविध विकासकामांची माहिती देणाऱ्या शिवसेनेनं आता आपली टॅगलाईन बदलली आहे. मुंबईभर '#डीड यू नो' नावाची मराठी आणि इंग्रजीत शिवसेनेच्या जाहिराती झळकत आहे. इंटरनेटवर डिड यू नो या शिर्षकाखाली इंटरेस्टिंग माहिती असते. त्याच धर्तीवर हा मार्केटिंग कॅम्पेन आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2017 02:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...