S M L

भुजबळांना व्हीआयपी ट्रीटमेंट प्रकरणी डॉ. तात्याराव लहाने दोषी

Samruddha Bhambure | Updated On: Jan 13, 2017 07:41 PM IST

भुजबळांना व्हीआयपी ट्रीटमेंट प्रकरणी डॉ. तात्याराव लहाने दोषी

13 जानेवारी :  माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी जे.जे. हॉस्पिटलचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने यांना विशेष ईडी कोर्टाने दोषी ठरवण्यात आलं आहे. मुंबईतील पीएमएलए कोर्टाने हा निर्णय दिला. यामुळे डॉ. लहाने अडचणीत आले आहेत.

अंजली दमानिया यांनी या प्रकरणी ईडी कोर्टात याचिका दाखल केली होती. तात्याराव लहाने यांनी छगन भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्याचा सल्ला दिला होता. त्यांचा हा सल्ला वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.Loading...

डॉ. तात्याराव लहाने यांनी मात्र दमानिया यांनी केलेले आरोप फेटाळून लावत आपला काहीही संबंध नसल्याचं सांगितलं. पण दमानिया यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत पीएमएलए कोर्टाने लहाने यांना दोषी ठरवलं आहे. लहाने यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पीएमएलए कोर्ट अवमानना प्रकरणावर सुनावणी करू शकत नसल्याने आता या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2017 07:35 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close