मनपा निवडणुकीत काँग्रेसच क्रमांक एकचा पक्ष राहील, संजय निरुपम यांचा दावा

  • Share this:

sanjay nirupam

13 जानेवारी : मनपा निवडणुकीत काँग्रेसच क्रमांक एकचा पक्ष राहील असा दावा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष  संजय निरुपम यांनी केला आहे. शिवसेना-भाजपाचा मनपातला कारभार पारदर्शक नाही. त्यामुळे लोकांची पसंती आम्हालाच मिळेल, असा दावा त्यांनी केला. असं असलं तरी काँग्रेस नेते कृष्णा हेगडे यांनी, मात्र अप्रत्यक्षरीत्या काँग्रेस नेते निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर काँग्रेसमधली गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली.

दरम्यान, संजय निरुपम यांचं नेतृत्व स्वकेंद्रीत आहे, ते इतर काँग्रेसच्या नेत्यांना सहभागी करुन घेत नाहीत अशी टीका कायम होत असते. हाच प्रश्न जेव्हा आम्ही विचारला तेव्हा संजय निरुपम चांगलेच भडकले, प्रश्नाचं थेट उत्तर देण्याऐवजी त्यांनी मुलाखत मधेच सोडून देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी बोलताना निरुपम यांनी राज्यभरात आघाडी शक्य असली, तरी मुंबईत मात्र आघाडी अशक्य आहे, असं स्पष्ट मत निरुपम यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत राष्ट्रवादीनं त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. जर पहिली यादी जाहीर झाली असेल तर आघाडी कशी काय होऊ शकते? त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांचीही मुंबईत आघाडी करु नये हीच इच्छा आहे.’ असं निरुपम यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 13, 2017, 7:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading