S M L

ही तर मोदींची स्टंटबाजी,अजित पवारांची चरखा फोटोवरून टीका

Sonali Deshpande | Updated On: Jan 13, 2017 12:19 PM IST

ही तर मोदींची स्टंटबाजी,अजित पवारांची चरखा फोटोवरून टीका

13 जानेवारी : भाजप सरकारच्या काळात मोदींचं मार्केटिंग करण्याचा फंडा अवलंबला जातोय.कोणत्याही प्रकारच्या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच फोटो वापरला जातोय. त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नाचं काही देणं घेणं नाही. फक्त स्वत:च ब्रँडिंग करून घेण्यात ते मश्गुल आहेत, अशी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

'भाजप सरकार सत्तेत आल्यापासून जाहिरातबाजी करण्यात दंग आहे, आता तर चक्क महात्मा गांधींना सुध्दा सोडलं नाही.खादी ग्रामोद्योगच्या वार्षिक कॅलेंडरच्या १२ही पानांवर मोदींनी स्वत:चाच फोटो गांधीजींच्या प्रेमाने छापला आहे. सत्तेत येण्यापूर्वी हेच लोक नथुराम गोडसे यांच्या जयंतीसाठी प्रयत्न करत होते आणि आता प्रसिध्दीचा नवा फंडा करुन मोदी नेहमीच चर्चेत राहण्यासाठी स्टंट करतात, मात्र या ठिकाणी काम करणारे कर्मचारी संतप्त आहेत असा उल्लेख करुन अजित पवार यांनी मोदींच्या ब्रॅंडिंगचा ग्रामीण भाषेत खरपुस समाचार घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2017 12:19 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close