S M L

काँग्रेसला फायदा होऊ नये म्हणून युती करावी-मुख्यमंत्री

Sonali Deshpande | Updated On: Jan 13, 2017 11:46 AM IST

 काँग्रेसला फायदा होऊ नये म्हणून युती करावी-मुख्यमंत्री

13 जानेवारी : काँग्रेसला फायदा होऊ नये म्हणून युती करावी अशी भूमिका मुख्यमंत्र्यानी काल झालेल्या बैठकीत मांडली.बैठकीत स्थानिक पातळीवर युतीची चर्चा सुरू करण्याचे आदेश दिले गेले. जिल्हा परिषद, पंचायत समिती ,महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री, जिल्हाध्यक्ष ,आणि संघटन मंत्री यांची काल रात्री 2 वाजेपर्यंत वर्षावर बैठक चालली.

2012मध्ये काँग्रेसचे 1065 नगरसेवक होते ते 2017मध्ये 919 आलेत आणि काँग्रेस भाजप पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. नगरपालिका निवडणुकीत सेना आणि भाजप एकत्र नगरसेवक 1823 आहेत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र नगरसेवक 1707 आहेत. म्हणजे भाजप आणि सेनेपेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी जास्त मागे नाहीत.त्यामुळे काँग्रेसमुक्त महाराष्ट्रासाठी युती अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली.युती करताना फक्त 2012च्या निवडणुकीच्या फॉर्म्युलानुसार नाही तर 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची जी ताकद वाढली त्या आधारावर जागा वाटप व्हावं असा आग्रह भाजपनं धरलाय.

पालिका निवडणुकांची घोषणा होताचं सेना भाजपवर उघड उघडपणे टीका करताना दिसत आहे.आता तर थेट सामानामधून भाजपवर टीका करण्यात आली आहे. महापालिकांची रणधुमाळी जोरात सुरू झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2017 11:45 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close