डोंबिवलीत झोपडपट्टीवासियांचा रेल रोको, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 12, 2017 04:22 PM IST

डोंबिवलीत झोपडपट्टीवासियांचा रेल रोको, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळी

Dombivli rail roko

12 जानेवारी :  डोंबिवली आणि कोपर स्टेशनजवळच्या झोपडपट्टीवासियांनी आज (गुरूवारी) रेलरोको केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या विरोधात हे नागरिक रेल्वे रुळांवर उतरल्यानं लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सध्या रेल्वे पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने रेलरोको करणाऱ्या लोकांना हटवलं असून लोकलची वाहतूक धीम्या गतीने सुरू झाली आहे. मात्र रेलरोकोमुळे झालेल्या खोळंब्याने लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे.

डोंबिवली-कोपर स्टेशनांदरम्यानची सिद्धार्थ नगर झोपडपट्टी रेल्वेच्या जागेवर उभी आहे. या झोपड्यांमुळे मोटरमनला सिग्नल स्पष्टपणे दिसत नाही. त्यामुळे ट्रॅकला अगदी चिकटूनच असलेल्या अनधिकृत झोपड्या पाडण्यासाठी आज रेल्वेचे अधिकारी पोलिसांसोबत पोहोचले. त्यांना 30 मीटर जागेवरील बांधकाम हटवायचं होतं.

मात्र, रहिवाशांनी या कारवाईला विरोध केला. त्याला न जुमानता अधिकाऱ्यांनी कारवाई सुरूच ठेवल्यानं संतप्त झालेल्या झोपडपट्टीतील रहिवाशांनी चारही रेल्वे ट्राकवर ठिय्या मांडला.  त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील लोकलचा खोळंबा झाला. अखेर रेल्वे पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने आंदोलकांना रेल्वे रुळांवरुन हटवल्यावर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2017 02:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...