चंदू चव्हाण सुखरूप; लवकरच होणार सुटका - सुभाष भामरे

  • Share this:

cHANdu chavan

12 जानेवारी : भारत-पाकिस्तान सीमारेषा चुकून ओलांडून पाक सैनिकांच्या जाळ्यात अडकलेला धुळ्याचा जवान चंदू चव्हाण लवकरच भारतात परतेल, असा विश्वास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आज  व्यक्त केला आहे.

फ्रान्सच्या सहकार्याने माझगाव गोदीमध्ये सुरू असलेल्या सहा स्कॉर्पिन पाणबुड्याबांधणीच्या प्रकल्पातील खांदेरी या दुसऱ्या स्वदेशी पाणबुडीचं आज संरक्षण राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जलावतरण झालं. त्यानंतर पत्रकरांशी बोलताना त्यांनी चंदू चव्हाणच्या सुटकेबाबतची सुखद बातमी सांगितली.

चंदू चव्हाणच्या सुटकेसंदर्भात पाकिस्तानच्या लष्करी कारवायांच्या महासंचालकांशी (डीजीएमओ) जवळपास 20 ते 22 वेळा चर्चा झाली आहे. सुरुवातीला काहीच सकारात्मक प्रतिसाद देत नव्हते, पण शेवटच्या वेळेस चंदूला सोडण्यासाठी पाकिस्तान अनुकुल असल्याचंही भामरे यांनी ठामपणे, सांगितलं आहे. चंदू चव्हाण जिवंत आहे, त्याची चौकशी पूर्ण झाली आहे आणि आम्ही त्याला लवकरच सोडू, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय, अशी माहिती सुभाष भामरे यांनी दिली.

मुळचे धुळयाचे असणारे 22 वर्षाचे चंदू चव्हाण 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये सेवा बजावत होते. 30 सप्टेंबरला गस्त घालत असताना चंदू चव्हाण यांनी नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला. यानंतर चंदू चव्हाण यांना पाकिस्तानच्या सैन्याने ताब्यात घेतलं. तेव्हापासून चंदू चव्हाण पाकिस्तानमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 12, 2017, 3:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading