मुंबई पालिकेसाठी सेना-भाजपमध्ये अटीतटी

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 12, 2017 01:41 PM IST

sena bjp kdmc

12 जानेवारी: महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजताच शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकांना वेग आलाय. सूत्रांच्या माहितीनुसार,भाजपला फक्त 80 जागा सोडायला सेना तयार आहे.तर भाजपला हव्यात 105 जागा.मुंबई पालिकेसाठी सेना-भाजप अटीतटीवर आलंय.

मुंबई पालिकेच्या 227 जागांसाठी सेना-भाजपमध्ये लढाई सुरू झालीय.

मुंबईत शिवसेनेचे ७७ नगरसेवक आहेत. या नगरसेवकांचे वाॅर्ड सोडून, २०१२च्या निवडणुकीत इतर वाॅर्डात, ज्या ठिकाणी कमी मतसंख्येने दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे उमेदवार होते,अशा वार्डची संख्या ५०च्या आसपास आहे. या वाॅर्डांतही शिवसेना आग्रही आहे. त्यामुळे उरलेल्या १०० जागांमध्येही शिवसेनेचे २० वाॅर्ड अटीतटीचे आहेत. त्यामुळे शिवसेना या १४० वाॅर्डात निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.

उरलेल्या ८७ वाॅर्ड संदर्भात शिवसेना भाजप सोबत चर्चा करणार आहे. पण भाजप २०१४ विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या आधारे १०५हून अधिक जागा मागत आहे. या मागणीला शिवसेना तयार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. पण कोणत्या जागा सोडायच्या यासाठी शिवसेनेच्या कोअर कमिटीची आज बैठक होत आहे. युतीबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. पण स्थानिक पातळींवर जागा सोडताना दोन्ही पक्षातील नेत्यांची रस्सीखेच खेच होणार आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2017 01:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...