सांगा कसा वाढणार शाळांचा दर्जा ? महाराष्ट्र शिक्षणामध्ये पिछाडीवर

सांगा कसा वाढणार शाळांचा दर्जा ? महाराष्ट्र शिक्षणामध्ये पिछाडीवर

  • Share this:

BMC-schools

10 जानेवारी :  महाराष्ट्र हा शिक्षणाच्या बाबतीत पिछाडीवर आहे, असं 'क्राय' म्हणजेच 'चाईल्ड राईट्स अॅण्ड यू' या संस्थेच्या अहवालात उघड झालंय. गेल्या 4 वर्षांपासून शालेय शिक्षणावर झालेला खर्च जीडीपीच्या 2.7 टक्के आहे. या तुलनेत ग्रॉस डोमेस्टिक प्रोड्युसचं महाराष्ट्र राज्याचं बजेट सरासरी 2.3 टक्के आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचं शिक्षणाचं बजेट सगळ्या जास्त आहे. पण तरीही शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र मागे राहिलाय हे धक्कादायक आहे.

महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांत प्रत्येक विद्यार्थ्यावर 28 हजार 630 रुपये खर्च करण्यात आले, असं 'क्राय' च्या अहवालात म्हटलंय. केंद्रीय विद्यालयात प्रत्येक विद्यार्थ्यावर 32 हजार 263 रुपये खर्च करण्यात आले. शिक्षकांच्या प्रशिक्षणावर राज्य सरकार आपल्या निधीतले अवघे 0.4 टक्के रुपये खर्च करतंय. प्राथमिक शिक्षणात कंत्राटी शिक्षकांचं प्रमाण वाढलंय. सेवा प्रशिक्षण मिळालेल्या शिक्षकांचं प्रमाण घटलंय, असंही ही आकडेवारी सांगते.

 सांगा कसा वाढणार शाळांचा दर्जा?

  • पहिली ते चौथीसाठी 50% शाळांमध्ये दोनच वर्ग
  • 32 टक्के शिक्षकांची पदं रिकामी
  • अनेक शाळांमध्ये ग्रंथालयांचा पत्ता नाही
  • 29 टक्के शाळांमध्ये पिण्याचं पाणी नाही
  • राज्यातल्या शिक्षणावर अर्थसंकल्पाच्या अडिच टक्केच खर्च

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2017 08:04 PM IST

ताज्या बातम्या