S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

अलविदा रफसंजानी...इराणच्या जनतेची श्रद्धांजली

Samruddha Bhambure | Updated On: Jan 10, 2017 08:02 PM IST

अलविदा रफसंजानी...इराणच्या जनतेची श्रद्धांजली

rafsanjani pic

10 जानेवारी :  इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अकबर हशेमी रफसंजानी यांचं रविवारी निधन झालं.  रफसंजानी यांच्या अंत्यदर्शनासाठी इराणची राजधानी तेहरानमध्ये हजारो नागरिक जमलेत. इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खामेनी यांनी रफसंजानी यांना श्रद्धांजली वाहिली. अकबर हशेमी रफसंजानी हे 1989 ते 1997 या काळात इराणचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचं वयाच्या 82 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं.

इराणमध्ये 1979 मध्ये झालेल्या क्रांतीमध्ये रफसंजानी यांचं महत्त्वाचं योगदान होतं. इराणमध्ये अमेरिकेचा पाठिंबा असलेली मोहम्मद रझा शाह पहलवी यांची सत्ता उलथवून इस्लामिक प्रजासत्ताक स्थापन करण्यात आलं. अयातुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली इराणमध्ये ही क्रांती  करण्यात आली.हशेमी रफसंजानी यांच्यावर त्यांच्या कडव्या कारकिर्दीबद्दल टीका झाली पण नंतर मात्र त्यांनी सुधारणावादी धोरण स्वीकारलं. त्यामुळे इराणच्या राजकारणावर रफसंजानी यांनी मोठा ठसा उमटवलाय. रफसंजानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तेहरानमधल्या रस्त्या-रस्त्यांवर इराणचे नागरिक जमले आहेत.

तेहरान विद्यापीठाच्या परिसरातही विद्यार्थी एकत्र जमून रफसंजानी यांना श्रद्धांजली वाहतायत. रफसंजानी यांचे फोटो असलेले फलक उंचावून त्यांना अलविदा केलं जातंय. इराणमधल्या क्रांतीचे नेते अयातुल्ला खोमेनी यांच्या स्मारकाजवळच रफसंजानी यांचा दफनविधी करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 10, 2017 08:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close